किनवट प्रतिनिधी विशाल भालेराव
आज.दि.25 आगस्ट रोजी किनवट तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.प्रत्येक शिवसैनिक हा उद्याचा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे या अनुषंगाने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या विचारावर काम करा.भविष्य शिवसेनेचे आहे असे प्रतिपादन बालाजी मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच नवतरुण अवधुत सोळंके ईस्लापुर परीसरात मोठ्या प्रमाणात मित्र मंडळ आहे आणि ते नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न असो त्यांच्या मदतीला धावून जातात.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणूका जवळ आल्या आहेत.या निवडणुकीत पक्ष मजबूत करीन असे प्रतिपादन अवधूत सोळंके यांनी सांगितले.यावेळी उपस्थित प्रशांत डांगे (ग्रामपंचायत सदस्य) विष्णू बैलवाड (शाखा प्रमुख), साईनाथ बैलवाड , जेष्ठ शिवसैनिक माधव बैलवाड उपस्थित होते.
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर