हिमायतनगर प्रतिनिधी : एम.यु.हनवते
दि.26/08/2022 वार शुक्रवार रोजी हिमायतनगर शहरात 'पोळा' हा सण आनंदात व शांततेत संपन्न झाला.सायंकाळी ठीक ५:वाजून 11 मिनिटाला बळीराजाच्या लग्नाला सुरुवात झाली. हा सण म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा सण होय. भारतीय संस्कृतीत पोळा या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
भारतातील वेगवेगळ्या राज्यात या सणाला वेगवेगळी नावे दिलेली आहेत;पण आजचा शेतकरी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरवर आधारित शेती करीत असल्याने बैलजोडीची संख्या फारच कमी झालेली दिसून आली. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाची वेगवेगळी निर्बंध लादलेली होती. आता जवळपास कोरोना या महामारीचे संकट दूर झाल्याने येणाऱ्या पुढील सण उत्सवाच्या संबंधी नागरिकात सण उत्सव साजरे करण्याची एक उत्सुकता लागलेली आहे.हिमायनगर येथील पोलिस प्रशासन आणि नगरपंचायत चे कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने हा सण आनंदात संपन्न झाला.