हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तहसील कार्यालय परिसरामध्ये तहसीलदार जिवनकुमार कांबळे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी शिवलिंग गोरे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे कृषी अधिकारी संदीप वळकुंटे तालुका आरोग्य अधिकारी रुणवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे व मीडिया प्रेस महासंघ प्रतिष्ठित मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न होत असून त्याच पार्श्वभूमीवर सेनगांव तहसील कार्यालयामध्ये सुद्धा आज दिनांक 15 आॅगष्ट रोजी तहसीलदार जिवक कुमार कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला आहे
91 INDIA न्यूज नेटवर्क प्रतिनिधी रवि गवळी