Type Here to Get Search Results !

जनशक्ती'च्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विनिता बर्फे यांची नियुक्ती




जनशक्ती च्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विनिता बर्फे यांच्या निवडीचे पत्र देताना संस्थापक अतुल खूपसे पाटील.

'जनशक्ती'च्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विनिता बर्फे यांची नियुक्ती

एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासमोर रॉकेल ओतून आंदोलन, पाण्याच्या प्रश्नासाठी औरंगाबाद येथे घागर मोर्चा, रायगड येथे आदिवासींसाठी आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, जनशक्तीच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रभर वृक्षारोपण कार्यक्रम शिवाय संघटनेच्या माध्यमातून महाराष्‍ट्रभर शेतकऱ्यांची कामे करणाऱ्या मुंबईच्या अध्यक्ष विनिता बर्फे यांची जनशक्ती महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या पदोन्नतीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी प्रदान केले.




 यावेळी बोलताना बर्फे म्हणाल्या की, जनशक्ती संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणारी, सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने काम करणारी, अन्यायग्रस्त पिडीत लोकांसाठी धावून जाणारी, अंध अपंग विधवा निराधार अशा घटकांसाठी काम करणारी संघटना असून. अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई अध्यक्ष म्हणून काम करत असताना प्रत्येक अडचणीत मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन करुन प्रेरणा दिली. त्यामुळे संघटनेने टाकलेली नवीन जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन संघटनेला वाढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी उमाकांत तिडके-पाटील, बाबाराजे कोळेकर, शर्मिला नलवडे, अरुण भोसले, प्रभाकर लखपत्तीवार, आण्णा महाराज पवार, अक्षय देवडकर, अनिल शेळके पाटील, संतोष कोळगे, गणेश ढोबळे, रामराजे डोलारे, अतुल राऊत, किशोर शिंदे, राणा महाराज, कल्याण गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad