Type Here to Get Search Results !

फुलसागंवी | पुरात वाहून गेलेल्या महिलेचा अखेर मृतदेह सापडला





पुरात वाहून गेलेल्या महिलेचा अखेर मृतदेह सापडला

फुलसावंगी ( दि ६ ) मौजे काळी ( टें ) येथील शेतकरी महिला गुरुवार दि ४ ऑगस्ट ला नाल्याला आलेल्या पुरात
वाहून गेली होती त्याच दिवशी स्थानिकांनी शोध घेतला परंतु ती महिला काही सापडली नाही शुक्रवारी दि ५ ला एन डी आर एफ ची टीम ने घटना स्थळापासून पैनगंगा पात्रा पर्यंत शोध घेतला तरी काहीच सापडले नाही




आज शनिवारी म्हणजे घटनेच्या तीसऱ्या दिवशी घटना स्थळापासून जवळ पास ४५ किमी अंतरावर, कवठा बाजार ता.आर्णी येथे नदी पात्राच्या किनाऱ्यावर स्थानिक नागरिकाला एका महिलेचे प्रेत दिसले वार्ता हवेसारखी पसरली काळी येथील जवळपास शंभर नागरिक तेथे पोहचले असता त्या प्रेताची ओळख पटली ते प्रेत काळी टे येथील कमलाबाई मारोती पवार वय ५० यांचे असल्याचे नातेवाईकांनी सांगितले शवविच्छेदनासाठी प्रेत आर्णी ग्रामिण रुग्णालयात नेणार असल्याची माहिती पो पाटलांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad