शेकापचे नेते डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांची संकल्पना , ३२७ रुग्णांची तपासणी
सांगोला (प्रतिनिधी):
सांगोला तालुक्याचे स्व.मा.आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शेकापचे नेते डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या संकल्पनेतुन भारतीय शेतकरी कामगार पक्ष, सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये रक्तदाब, मधुमेह,हाडांच्या व स्नायूच्या विविध आजारांची तब्बल ३२७ रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांनी केली.
सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज या ठिकाणी स्व.मा.आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख यांची जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन श्रीमती रतनबाई गणपतरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते स्व. मा.आम.गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत (दादा) देशमुख हे होते. याप्रसंगी शेकापचे नेते डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती बाळासाहेब काटकर ,शेतकरी सहकारी सूतगिरण संचालक बाळासाहेब एरंडे, अमोल खरात (युवा नेते),जि.प.सदस्य दादासाहेब बाबर,नगरसेवक बाळासाहेब झपके,माजी जि. प.सदस्य संगम धांडोरे ,माजी नगराध्यक्ष मारुती बनकर,मार्केट कमिटीचे चेअरमन गिरीश गंगथडे,ॲड.धनंजय मेटकरी , राजू मगर,माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी,बिरुदेव शिंगाडे, माजी सभापती मायाक्का यमगर,माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे, हणमंत कोळवले , डॉ.दादासाहेब जगताप,पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष दीपक गोडसे, कार्याध्यक्ष ॲड विशालदीप बाबर, ॲड. मारुती ढाळे साहेब , अशोक वाकडे (सर),उल्हास धायगुडे (युवा नेते) , राजेंद्र देशमुख (संचालक) , बाळकृष्ण कोकरे सर , रमेश जाधव (इंजिनिअरिंग) ,माजी जि.प.सदस्य किसन माने , हरीभाऊ पुकळे , बयाजी लवटे मा.सरपंच सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वतः युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांचेसह डॉ.प्रभाकर माळी , डॉ बाबासाहेब देशमुख , डॉ.धनंजय गावडे , डॉ सचिन गवळी , डॉ.सुनील लवटे , डॉ.अजिंक्य नष्टे ,डॉ.सुदीप चव्हाण या तज्ञ डॉक्टरांनी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे तपासणी करून मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी तालुक्यातून सर्व ठिकाणच्या रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला.
सदरचे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक तसेच न्यू इंग्लिश स्कुल व क.महाविद्यालय व विज्ञान महाविद्यालयाचे मुख्याध्यापक,प्राचार्य, प्राध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन शिबीर यशस्वीपणे संपन्न केले.
डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगोल्याच्या नागरिकांना रुग्णसेवेतून दिला जनसेवेचा विश्वास.
येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आपुलकीने विचारपूस करीत डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांनी स्वतः तपासणी केली. भविष्यात कोणत्याही अडचणी असेल तर त्या सोडवू तसेच गंभीर स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्यास अल्प खर्चात उपचार करण्यास तसेच यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा विश्वास प्रत्येकाला दिला. या शिबिरासाठी उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांचेही डॉ. अनिकेत देशमुख यांनी आभार मानले.
1)आरोग्य शिबीराचे उदघाटन करताना रतनबाई गणपतराव देशमुख , चंद्रकांत (दादा) देशमुख, डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख व उपस्थित मान्यवर
2) डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी व तपासणी करताना