हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे.
तालुक्यातील कारला येथील सरपंच ग्रामसेवक यांनी कारला पिचोडी गावाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची ओरड ग्रामस्थातून मागील अनेक महिन्यापासून होत होती याचाच धागा पकडत आमच्या प्रतिनिधीने याबाबत सतत पाठपुरावा करत.
कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्रामपंचायतील सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांना जागे करण्यासाठी वेळोवेळी निडरपणे सडेतोड लिखाण केल्यामुळे अखेर आज कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन जिल्हा परिषद शाळा येथे थातूरमातूर प्रमाणात का होईना काम केले त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ध्वजाला सलामी त्रास होणार नाही यासाठीच आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो