Type Here to Get Search Results !

सेलू | आजादी का अमृत महोत्सवानिमित्त सर्व शाळेतील विद्यार्थी शिक्षक नागरिक सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमास सहभागी




सेलू शहरामध्ये आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आज ९ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी शिक्षक नागरिक सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमास सहभागी झाले होते.





सेलू शहरांमध्ये उपविभागीय कार्यालय व नगरपरिषद यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते.




यावेळी सेलू शहराचे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष माननीय विनोद बोराडे साहेब, उपजिल्हाधिकारी माननीय सौ .अरुणा संगेवार मॅडम तहसीलदार माननीय दिनेश झापले साहेब ,नगर परिषद चे मुख्य अधिकारी माननीय देविदास जाधव साहेब पोलीस निरीक्षक माननीय रावसाहेब गाडेवार साहेब व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व बाकी सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते परिसरातील नागरिक या राष्ट्रीय सामूहीक गीताच्या कार्यक्रमास सहभागी झाली होती.

प्रतिनिधी:- तथागत अवचार 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad