किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड इस्लापूर निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे ..
गेल्या चार दिवसापासून चालू असलेल्या सतत पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहताना पाहावयास मिळत आहे.
मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई पुणे आंध्रप्रदेश तेलगांना राज्य यासारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत .
पण या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी कुठलीही लॉजिंग सारखी किंवा रिसोड सारख्या सुविधा नसल्यामुळे या पर्यटन स्थळाचा पुरेपूर पर्यटकांना आनंद घेता येईना. नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कालावधीमध्ये या पर्यटन स्थळाच्या विकासाना चालना मिळाली होती पण त्यानंतर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष न दिल्यामुळे या पर्यटन स्थळाचा विकास खुंटला. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन विटकर यांनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष वेधावे अशी मागणी या भागातील जनतेतून पुढे येत आहे.
प्रतिनिधी : गजानन वानोळे