Type Here to Get Search Results !

गोदावरी अर्बन "हर घर तिरंगा" अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार




गोदावरी अर्बन "हर घर तिरंगा" अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार
-व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये "हर ब्रँच तिरंगा" उपक्रम

नांदेड, ता.२६ (बातमीदार) - या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" अभियानात प्रत्येक नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून गोदावरी अर्बन परिवार देखील "हर घर तिरंगा" अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. अशी गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली.
               तरोडा नाका येथील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य या मुख्यालयाचे कार्यालय प्रमुख विजय श्रीमेवार, विपनन व्यवस्थापक महेश केंद्रे, शाखाधिकारी मुख्य शाखा अविनाश बोचरे, चिखलवाडी ब्रँचचे मॅनेजर गुरुतेजसिंघ चिरागीया यांच्या टिमने सोमवारी (ता.२५) जिल्हाधिकारी डॅ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत "हर ब्रँच तिरंगा" हा उपक्रम हाती घेतला असल्याची जिल्हाधिकारी यांनी निवेदनाद्वारे माहिती दिल्याची व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली आहे. 

              पुढे ते म्हणाले की, गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये नियमितपणे सांस्कृतीक व समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे. याच धर्तीवर गोदावरी अर्बनच्या वतीने देखील हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यासोबतच राष्ट्रीय ध्वजाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन हा "हर ब्रँच तिरंगा" उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे श्री तांबेकर यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad