दिनांक (27)
सोलापूरात तंबाखू विरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पान टपरी धारकांवर धडक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. पोलीस प्रशासन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या कोटपा कायदा 2003 अंमलबजावणी पथकाने ही कारवाई केली.
कोटपा कायदा कलम चार, सहा अ व ब अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवायामध्ये फौजदार चावडी पोलीस चौकी परिसरातील दहा पान टपरी धारकांकडून एकूण दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
या कारवाया पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व फौजदार चावडी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
या पथकामध्ये तंबाखू नियंत्रण कक्ष सोलापूरचे जिल्हा सल्लागार डॉ. निलेश कोकरे, समुपदेशिका मंजुश्री मुळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष चानकोटी व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांचा समावेश होता.
प्रतिनिधी :- संतोष काळे