मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुन्हा एकदा हजेरी लावल्याने किनवट तालुक्यातील इस्लापूर शिवणी,आप्पारावपेठ जलधरा या परिसराला आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले, आज पहाटे पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत या नदी नाल्याचे पाणी जवळपासच्या शेतात गेल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे . यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी होताच मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असुन सर्व मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दोन दिवस विश्रांती घेत दिनांक 26 च्या पहाटेपासून जोरदार बॅटिंग केल्याने परिसरातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे नांदेड किनवट या राज्य महामार्गावरील वाहतूक देखील बंद झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, इस्लापूर सह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या शेतीपीकांचे नुकसान झाले असुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर