Type Here to Get Search Results !

हिमायतनगर ते घारापुर फाटा रोड लवकर करण्याची जनतेतून मागणी




हिमायतनगर ते घारापुर फाटा रोड लवकर करण्याची जनतेतून मागणी

प्रतिनिधी : एम . यू हनवते ता . हिमायतनगर




अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला • हिमायतनगर ते घारापुर फाटा 3 किमी पर्यंतच्या रोडच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे.पण मधातच गुतेदाराच्या हलगर्जीपणाने रस्त्याच्या कामाला स्थागिती आल्याने रोड पूर्वीपेक्षा अजूनच खराब होऊन वाहनांना येजा करण्यासाठी कठीण झाला आहे . याचे कारण म्हणजे पूर्वी रस्त्यावरती खड्डे होती आणि त्यांना बुजविण्यासाठी व रस्त्याच्या रुंदीकरण्यासाठी रस्त्याच्या काही ठिकाणी टाकलेला मुरूम पाऊस पडलाकी रस्ता चिखल होऊ येणारे जाणारे जड वाहन त्यात रुतून बसत आहे व रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे हा मार्ग तेलंगणा , मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा मधला मार्ग असून याच रस्त्याने वाहनांची मोठ्याप्रमाणात नेहमीच येजा असते . 




व्यापाराच्या दृष्ठीकोनातून आणि शैक्षणिक दृष्टीकोनातून हा रस्ता अतिशीय महत्वाचा आहे . दररोज शेकडो वाहने याच रस्त्याने येजा करीत असतात शासन आणि प्रशासन स्तरावर संबांधितानी लक्ष घालून हा मार्ग लवकरात लवकर दर्जेदार करून एकदाची रस्त्याची कायमची समस्या संपुष्ठात आणावी अशी गावकरी व प्रावाशांमधून मत व्यक्त होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad