Type Here to Get Search Results !

बिरसा क्रांती दलाची कार्यकर्ता ,पदाधिकारी बैठक संपन्न नवीन सदस्यांच्या नियुक्ती पत्र देऊन सन्मान




बिरसा क्रांती दलाची कार्यकर्ता ,पदाधिकारी बैठक संपन्न
नवीन सदस्यांच्या नियुक्ती पत्र देऊन सन्मान


बिरसा क्रांती दलाची यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ता,पदाधिकारी यांची बैठक वसंतराव पुरके कला विज्ञान महाविद्यालय बोरगडी,पुसद येथे मा.दशरथ मडावी,संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष,बिरसा क्रांती दल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बिरसा क्रांती दल आदिवासींची आत्मसन्मान,अस्मीता,अस्तीत्व,शिक्षण ,आरोग्य या संदर्भाने समाजात विविध पातळ्यावरती काम करीत असते.समाजाला आधुनिक विकासाच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी सातत्याने समाजात जनप्रबोधन करण्याचे काम करते.संघटनेला व्यापक स्वरुप देण्याचे काम संघटनेचा प्रशिक्षित कार्यकर्ता करीत असतो.कार्यकर्त्याच्या मेहनतीवर संघटन मजबुत होत असते,असे प्रतिपादन मा.दशरथ मडावी यांनी केले.आदिवासी सन्मान परीषदेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता मेहनत घेणार्या कार्यकर्त्यांचा सन्मान मा.दशरथ मडावी यांचे हस्ते करण्यात आला.कार्यकर्त्यांना संघटनेच्या विविध पदावर नियुक्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला. बैठकीला रंगराव काळे,प्रदेश अध्यक्ष,डी.बी.अंबुरे,उपाध्यक्ष,किरण कुमरे,महासचिव ,नारायण पिलवंड,राज्य प्रशिक्षक (बि.व्ही.एफ.),रमेश भिसनकर,जिल्हा अध्यक्ष,यवतमाळ,संतोष ठाकरे,जिल्हा अध्यक्ष,अकोला,संभाजी खुळे,जिल्हा महासचिव,बुलडाणा,अतुल कोवे,विदर्भ संघटक,पुष्पा ससाने,जिल्हा अध्यक्ष,महीला फोरम,* शरद चांदेकर,मुखाडे सर उपस्थित होते.बैठक यशस्वी करण्याकरीता विठ्ठल पोटे,दादाराव चिरंगे,अनंता पांडे,मेजर जीवन कोवे,काशिनाथ खरवडे ,निलेश उकंडे,डॉ.गणेश वानोळे,संतोष इंगळे,रवी खाकरे,शारदा वानोळे यांनी मेहनत घेतली.बैठकीला राजु पेदेवाड,सचिन पेदेवाड,परशराम ससाने,अनिकेत मेटकर,विलास ढगे,जयस नवले,आकाश मुखाडे,विलास ठाकरे,तुकाराम जुमनाके,रामचंद्र लोखंडे,रामराव करवते,सुरेश तुमसरे, निखिल सिडाम,अजाबराल वलके,शांतीदास खोकले,संजय अंभोरे,विलास दलशिंगारे,भागवत काळे,संतोष बुरकुले,विजय भुसारे,अजय ढंगारे, महासचिव संजय मडावी यांनी तर आभार जिल्हा सचिव नागोराव गेडाम यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad