कृषी विभाग, जैन इरिगेशन आणि सप्तेश्वर अग्रो बेंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सोसायटी बेंबळे येथे शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
ठिबक सिंचनाची निवड व देखभाल, स्वयंचलित ठिबक पद्धत, उती संवर्धित उत्पादने, पाण्याचे व खतांचे पीक व्यवस्थापन यासारख्या अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
याचबरोबर शेतकऱ्यांना असणाऱ्या विविध प्रकारच्या शंकांचे निरीसन शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. ठिबक द्वारे योग्य पद्धतीने खत व पाण्याचा वापर केल्याने उत्पादनात कमालीची वाढ होऊन पाण्याचा आपद्वय कमी होत असल्याने या ठिबक सिंचन पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवान गोविंद भोसले संस्थापक, शिवाजी शिक्षण संस्था यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून जैन इरिगेशन विभागीय व्यवस्थापक संतोष डांगे, किरण पाटील यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर याबाबत मार्गदर्शन केले यावेळी सेल्स इंजिनियर गजानन कोटकर, उपस्थित सरपंच विनोद पवार, ऊसभूषण शेतकरी सोमनाथ हुलगे, जयवंत भोसले, मोहन भोसले,महेश रामदाशे,पत्रकार सिद्धेश्वर शिंदे गावातील इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.