Type Here to Get Search Results !

अकोले खुर्द येथे पीक परिसंवाद संपन्न कृषी विभाग, जैन इरिगेशन आणि जोतिर्लिंग कृषी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने

अकोले खुर्द येथे पीक परिसंवाद संपन्न कृषी विभाग, जैन इरिगेशन आणि जोतिर्लिंग कृषी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने




दिपक मामा पाटील यांच्या अकोले खुर्द येथील प्रात्यक्षिक केळी आणि ठिबक प्लॉटवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ठिबक सिंचनाची निवड व देखभाल, स्वयंचलित ठिबक पद्धत, उती संवर्धित उत्पादने, पाण्याचे व खतांचे पीक व्यवस्थापन, केळी पीक लागवड यासारख्या अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 




याचबरोबर शेतकऱ्यांना असणाऱ्या विविध प्रकारच्या शंकांचे निरसन शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. ठिबक द्वारे योग्य पद्धतीने खत व पाण्याचा वापर केल्याने उत्पादनात कमालीची वाढ होऊन पाण्याचा अपव्यय कमी होत असल्याने जैन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करावा आणि कृषी विभागातील योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील यांनी केले.




प्रमुख मार्गदर्शक म्हणून जैन इरिगेशन चे कृषीतज्ञ किरण पाटील आणि गजानन कोटकर यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सरपंच कांतीलाल नवले, ऊसभूषण शेतकरी सोमनाथ हुलगे, कृषी सहाय्यक सतीश गोसावी, संभाजी पाटील, संतोष पाटील, हरिदास पाटील, महेश पाटील, भारत नवले, विनोद पाटील, महादेव घाडगे, अंगत पाटील, गणेश पवार, सचिन पाटील, प्रकाश घाडगे, तेजस नवले, कुबेर महाडीक, बाबुराव घाडगे, योगेश पाणबुडे परिसरातील इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजक महावीर जगताप आणि दिपक मामा पाटील यांनी आभार मानले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad