सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत 27% राजकीय आरक्षण पूर्वत लागू झाल्यामुळे ओबीसी संघर्ष समिती ता. कळमनुरी च्यावतीने आज दि.20 जुलै 2022 रोजी सामाजिक क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्या समोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष ॲड.रवि शिंदे, उपाध्यक्ष विठ्ठल गाभाणे, सचिव उमेश गोरे, माजी जि.प. सदस्य गणेशराव गुठे,माजी नगरसेवक ॲड. ईलीयास नाईक, हाफिज फारूखी,नेहाल कुरेशी,राजू संगेकर,ॲड.अमोल डिग्गीकर,प्रदीप मस्के ,शरद सुरुशे,राजकुमार जाधव,दत्ता गोरे, कृष्णा हाक्के, सर्जेराव दिंडे, सरपंच भोजले,दौलत धनवे,अक्षय मस्के,सुनील पाईकराव यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सामील होते.