उमरखेड प्रतिनिधी संजय जाधव
बिटरगांव बु.ते ढाणकी या रस्त्याच्या दुरुस्तीची बांधकाम विभागाला व लोकप्रतिनिधी यांना वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्ती न केल्याने येथील गावातील नागरिकांनी लोकवर्गणी करून व श्रमदान करून रस्त्याची दुरवस्था सुधारणा करण्यासाठी सर्व समोर आले.
अनेक दिवसांपासून बिटरगांव बु ते ढाणकी रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याने वाहने चालवणे अवघड झाले होते. बांधकाम विभागाकडे मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्ती विषयी कोणतीही कार्यवाही होत नव्हती. शेवटी कंटाळून बिटरगांव बु येथील गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला.या परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी करून या रस्त्यावर जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने मुरुम टाकून श्रमदान करून खड्डे बुजवले. यामुळे वहातुकीसाठी योग्य रस्ता तयार झाला आहे.यासाठी गावातील तरुण व प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक श्रमदान करत आहेत.