Type Here to Get Search Results !

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कामगारांच्या वतीने नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार




श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कामगारांच्या वतीने नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार

सर्व कामगारांचे आरोग्य तपासणी करण्यात आली तर महिलांसाठी शिवण यंत्र क्लास घेणार




पंढरपूर (प्रतिनिधी):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी घवघवीत यश संपादन केलेबद्दल व त्यांच्या ३९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.




यावेळी सत्कारास उत्तर देताना चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी सर्व कामगारांचे आभार व्यक्त करुन कारखान्यास गतवैभव आणणेसाठी कारखान्याचे सर्व कामगारांनी यापुर्वी प्रमाणिक काम केलेले असून यापुढेही प्रमाणिक काम करावे. सध्या कारखान्याच्या मशिनरी दुरुस्तीची कामे चालू असून कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणेचा मानस असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये १४ लाख ५० हजार मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवून सभासद शेतकऱ्यांना रु.२५००/- ऊसदर देणेसाठी कामगारांनी कामे करावीत त्यासाठी कारखान्यास कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. तसेच सर्व संचालक मंडळ व कामगारांनी समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे काम करुन कारखाना महाराष्ट्रात नंबर १ वर आणून कारखान्यास पुढील ५० वर्षे कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा व्यक्त केली. तसेच ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेसाठी वाहन मालकांना रु.२.०० लाखाचा पहिला हप्ता देणेत आला. कामगारांचा २०१९ पासून ३१ महिन्याचा पगार व इतर देणी थकीत राहीलेला असून ते टप्या-टप्याने मार्गी लावणेत येतील.




पुढे बोलताना ते म्हणाले की नवीन कामगार भरती करताना जुन्या कामगारांच्या अनुभवाचा विचार करुन त्यांना बढती देणेत येईल. कामगारांच्या आरोग्यासाठी आज कारखाना कार्यथळावर विठाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर यांचेतर्फे कारखान्याचे सर्व कर्मचाऱ्याारी वर्गाचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणेत आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी तपासणी करुन घ्यावी असे आरोग्य शिबीर ३ ते ६ महिन्यातून एकदा घेतले जाईल. तसेच कामगारांच्या घरातील महिलांसाठी नवीन उद्योगाचा प्रयोग म्हणून शिलाई मशिनचे ट्रेनिंग देवून त्यांना रोजगार मिळवून देवू.




सदर वेळी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन सर म्हणाले की, कारखाना फक्त अभिजीत (आबा) पाटील हेच चालवू शकतात. त्यांनी आपणास आवाहन केलेले असून त्यांच्या आवाहनास आपण सर्व कामगारांनी साथ दिल्यास कारखान्यास पूर्वी प्रमाणे गतवैभव प्राप्त होईल अशी आशा व्यक्त केली.




स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी केले. सदर प्रसंगी कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, धनंजय काळे, दिनकर चव्हाण, जनक भोसले, प्रविण कोळेकर, अशोक जाधव, साहेबराव नागणे, कालिदास पाटील, कालिदास साळुंखे, संभाजी भोसले, सचिन वाघाटे, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, सिताराम गवळी, सिध्देश्वर बंडगर, सौ. सविता रणदिवे, श्रीमती कलावती खटके, पंढरपूर तिर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, तिसंगीचे सरपंच पिंटु पाटील, सरकोलीचे सरपंच शिवाजी भोसले व कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर प्रतिनिधी दिनेश खंडेलवाल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad