प्रतिनिधी एम.यु हनवते ता.हिमायतनगर 'स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ' नांदेड पदवीधर अधिसभा (सिनेट) 2022 च्या पुढील होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून हिमायतनगर येथील 'नालंदा बुद्धविहार' येथे दि.31/07/2022 रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विध्यार्थी आंदोलन संघटने अंतर्गत नुकतीच चिंतन बैठक संपन्न झाली.
या सभेला या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.संदीप वणे उपस्थित होते. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ 2022च्या सिनेटच्या होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून पदवीधरांनी मतदार नोंदणी कशी करायची व निवडणूक कशी लढवायची व तसेच विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे सोडवावेत या संधर्भात उपस्थित सर्व पदवीधरांसोबत चर्चा करून मार्गदर्शक सूचना केल्यात.या बैठकीला जिल्हास्तरावरील संघटनेचे जिल्हाकोषाध्यक्ष अश्वजीत वाघमारे व तसेच रत्नाकर अण्णा जोंधळे, किरण कदम, दिपक पोहरे, गौरव कदम, पस्थित होते.व तसेच शहरातील वंचित बहुजन आघाडी तालुका माजी शहराध्यक्ष विशाल हनवते, स्वप्नील हनवते ,प्रमोद हनवते ,अंकुश आंबेकर, शुभम रोकडे एम. यु . हनवते सर आदी उपस्थित होते.