आज दिनांक 30/7/2022रोजी जिल्हा शलचिकित्सक कार्यालय, तंबाखू नियंत्रण कक्ष सोलापूर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासाठी कोटपा 2003 अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत तंबाखू नियंत्रण कक्षाची माहिती व तंबाखू विरोधी शपथ श्री.अमित महाडिक यांनी दिली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले.कार्यक्रमास 11 तालुक्यातील पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी - सौ. मंजूश्री संतोष काळे
सोलापूर