हिमायतनगर येथे दि.26/07/ 22 रोजी मध्यरात्रीपासूनच पावसाने हजेरी लावलेली होती. सकाळच्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने हिमायतनगर शहराला तलावाचे स्वरूप आले होते व तसेच शहरा नजीकच्या नाल्याना पूर आला होता. गावातील व तालुक्यातील सर्वच नाले ओसंडून वाहत होते. तर दिवसभर पडलेल्या पावसाने मात्र अनेक घरांची पडझड झालेली दिसून आली. त्यात मधुकर दत्ता हनवते यांच्या राहत्या घरांची भिंत पडून घरात पाणी शिरले. हिमायतनगर शहर व तालुक्यातील गावात पडझड झालेल्या अनेक घरांची महसूल विभागामार्फत फेर तपासणी करून त्यांना अनुदान मिळवून द्यावेत.अशी भावना गावकऱ्यातून व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी. एम .यू हनवते