Type Here to Get Search Results !

रूपापेठ येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट




रूपापेठ येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट

भाजपा आदिवासी आघाडी कोरपना चा पुढाकार

कोरपना :मनोज गोरे




तालुक्यातील रूपापेठ येथे भारताच्या 15 व्या राष्ट्रपती, पहिल्या देशातील आदिवासी महिला श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट व कोरपणा तालुका भाजपा आदिवासी आघाडी च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर भाजपा कोरपना तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष हे होते. तर उदघाटक म्हणून कोरपना तालुक्यातील आदिवासी नेते अरुण मडावी हे होते,
                विशेष अतिथी सतीश उपलेंचीवर विस्तारक राजुरा विधानसभा तथा माजी नगरसेवक गडचांदूर हे होते ,भाजपा युवा नेते, निलेश भाऊ ताजने, हरिभाऊ घोरे, पुरुषोत्तम जी भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, जेष्ठ नेते लोडबाजी इंगळे, पारडी चे माजी सरपंच रामदास कुमरे, आदिवासी युवा नेते, हिरापूरचे माजी सरपंच प्रमोद कोडापे हे होते, दिनेश सूर भाजपा युवा जिल्हा सचिव, दिनेश खडसे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

   आदिवासी नेते अरुण मडावी यांनी आपल्या मनोगतात 75 वर्षाच्या इतिहासात प्रथमत देशाच्या सर्वोच्च मोठया राष्ट्रपती पदापर्यंत पोहचण्याची संधी आदिवासी समाजाला देशाचे पंतप्रधान नरेंदजी मोदी यांच्या मुळे मिळाली हे आदिवासी बांधवांनी विसरू नये असे सांगितले.

            या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रूपापेठ येथील जेष्ठ नागरिक आदिवासी नेते नामदेव पाटील आत्राम,माजी सरपंच लक्ष्मण चाहकाटे, भाजपा आदिवासी आघाडी चे कोरपना तालुका अध्यक्ष मनोज भाऊ तुमराम, शामराव पा. मंगाम, अर्जुन वलके, कवडू मडावी, तुकाराम गेडाम,किशोर तलांडे आदिनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad