Type Here to Get Search Results !

102 रुग्णवाहिका वाहन चालकांचे 3 महिन्यांपासून मानधन थकीत




102 रुग्णवाहिका वाहन चालकांचे 3 महिन्यांपासून मानधन थकीत

कोरपणा /चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

चंद्रपूर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका वाहन चालक या पदावर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांचे मागील तिन महिन्यांचे थकीत मानधन मिळाले नसल्याने आज जिल्ह्यातील विवीध प्राथमिक आरोग्य केद्रातिल कार्यरत असलेले 102 क्र.रुग्णवाहिका वाहन चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

मागील 5 ते 7 वर्षांपासून 102 रुग्णवाहिका वाहन चालक प्रामाणिकपणे 24 तास आपली सर्व कामे जबाबदारीने पूर्ण करीत आहेत. तसेच गरोदर माता व स्थनदा माता व ईतर रूग्न यांना देण्यात येणारी सर्व सेवा 24 तास अविरतपने देत असतात.व कोरोना सारख्या महामारिच्या काळात स्वताची व परिवाराच्या जिवाची पर्वा न करता 24 तास सेवा देण्याचा काम वाहन चालकानी योग्य रित्या पार पाडले.व कामाचा मोबदला मणून त्यानां तूटपूंज्या मानधन स्वरूपात मिळत आहे. मानधन हे नियमित न मिळता तिन ते चार महिने मानधनाची 102 रुग्णवाहिका वाहन चालकांना वाट बघावी लागते. त्याना मिनीमम ए्याक्ट नूसार 15500 वेतन मिळने गरजेचे असताना त्याना फक्त 7300 रू मानधन स्वरूपात वेतन मिळतो. 

अशा या तूटपूंज्या मानधन तत्वावर परीवारीक जबादरी पार पडतानां त्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अश्याततच त्यानां मूलांच्या शिक्षणाचा खर्च दवाखान्याचा खर्च व परीवारीक खर्च या महागाईच्या काळात परवळन्या जोगे नाहीत अशाप्रकारे 102 रुग्णवाहिका वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

102 रुग्णवाहिका वाहन चालक ग्रामीण पातळीवर 24 तास आपले कामकाज जबाबदारीने पूर्ण करीत असून, यांच्या समस्यांकडे शासन तथा प्रशासन डोळेझाक करत आहे. 

 परंतु थकीत मानधनाबाबत वरिष्ठ अधिकारी यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे नेहमीच दिली जातात. तरी प्रशासनाने तातडीने लक्ष केंद्रित करून त्वरित 102 रुग्णवाहिका वाहन चालक यांचे मानधन करावे अशी मागणी 102 रुग्णवाहिका वाहन चालक यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad