फलटण तालुक्यातील सर्व शिवसैनिक उद्धवसाहेब ठाकरेंंच्या पाठीशी ठाम व एकनिष्ठ : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
शिवसेना भवन येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांची मिटींग झाली. राज्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाप्रमुख पदाधिकारी ऑनलाईनद्वारे या मिटींगसाठी हजर होते. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द बोलुन दाखवली. ज्या पक्षाच्या अंगा खांद्यावर वाढलात त्या शिवसेनारुपी झाडाची पाने, फुले, फळे, फांद्या घेऊन गेलात तरी हरकत नाही. येथे जमलेल्या पैकीही कोणाला जायचे असेल तर जरुर जावे. मला त्याची चिंता अजिबात नाही. कारण शिवसेनारुपी झाडाची मुळे घट्ट आहेत. त्यामुळे राखेतुन उठुन शिवसेना पक्ष पुन्हा भरारी घेईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी गद्दारांना लगावला. मी शिवसैनिकांना नको असेल तरी सांगा, मी बाजुला होतो असे त्यांनी यावेळी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना उघड आवाहनही केले.
शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन आपणच तिथे योग्य आहात. आपणच शिवसेना पक्ष व शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेला सांभाळण्यासाठी सर्वोत्तम आहात. असे म्हणत सर्व शिवसैनिकांनी उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन गगनभेदी घोषणा देत जयघोष केला.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना आपल्याला लढायचं आणि जिंकायचंच आहे असा मजबुतीने संदेश दिला. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याचा संकल्प यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे, उपनेते बानुगडे पाटील, शिवसेना सचिव विनायक राऊत या सर्वांनी आपापल्या भाषणातुन व्यक्त केला. महाराष्ट्रातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेना व मातोश्रीच्या पुर्णपणे कायम पाठीशी असुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहुन एकनिष्ठ राहणार असल्याचे वचन यावेळी दिले.
या मिटींगमध्ये शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी ऑनलाईनद्वारे सहभागी होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवुन दिले.