Type Here to Get Search Results !

वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथे महाराजस्व अभियान

राजकीय भूकंप व इतर आमदारांची पळापळ चालू असतांसुध्दा आमदार राजुभैया नवघरे हे जमिनीवर बसून जनसेवा करण्यात मग्न आहेत.



 
सर्वत्र राजकिय वातावरण पेटलेले असतांना व सत्तेचा लाभ घेण्याची चुरस चालू असतांना सुध्दा आ. राजुभैया नवघरे हे जनसेवा करत आहेत . सत्ता आणि सत्तांतरा पेक्षा जनता महत्वाची आहे. आपण सत्तांतरा पेक्षा जनतेची सेवा केली पाहिजे हे चित्र आ.राजुभैया नवघरे यांच्या कार्यातून प्रामुख्याने दिसून येत आहे.
 बाभूळगाव येथे आ.राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत समाधान शिबीर तसेच राजुभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान अंतर्गत जनसंवाद दौरा व नेत्र तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. 




या शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला व या शिबिरा अंतर्गत असलेल्या अनेक योजनांचा लाभ घेतला. 




या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल लावून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येत होते. यामध्ये SBI Bank, गॅस कनेक्शन, दिव्यांगांच्या समस्या, घरकुल प्रश्न, राशनकार्ड, एकात्मिक बाल विकास, महसूल विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, सहकार व पणन वस्त्रोद्योग, नेत्र तपासणी शिबीर, महसूल फेरफार अदालत, भुमी अभिलेख, महिला व बालकल्याण, पुरवठा विभाग, बँक ऑफ इंडिया, आरोग्य विभाग, आधार कार्ड विभाग, MSEB विभाग, बचत गट इत्यादी संबंधित समस्यांचे निराकरण या शिबिरामध्ये करण्यात आले. तसेच या कार्यक्रमा निमित्ताने अनेक गरजूंना संबंधित लाभ वाटप करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. 




याप्रसंगी मा.जितेंद्र पापळकर साहेब जिल्हाधिकारी हिंगोली, मा.डॉ.सचिन खल्लाळ साहेब उपविभागीय अधिकारी, मा.अरविंद बोळंगे साहेब तहसीलदार वसमत, मा.कल्याण पाड साहेब तालुका कृषी अधिकारी, मा. मा.उमाकांत तोटावाड साहेब BDO, THO काळे साहेब,मा.तानाजी भोसले गट शिक्षण अधिकारी,API चवळी साहेब, भुमी अभिलेख अधिकारी,एम एस बी अधिकारी व तालुक्यातील सर्व तहसील व मंडळ अधिकारी उपस्थित होते...









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad