उमरखेड तालुक्यात जल सुविधा (वॉटर फिल्टर )यंत्र खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप
प्रतिनिधी निगंनुर : -मैनोदिन सौदागर ता.उमरखेड जि.यवतमाळ
यवतमाळ जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा सन 20 19 - 20 अंतर्गत सुमारे 12 लाख 43 हजार रुपये किंमतीचे सौर उर्जेवरील जलसुविधा ( वॉटर फिल्टर ) यंत्र टंचाईग्रस्त ग्रामिण भागात ठिकठिकाणी बसविण्यात आले . ते सर्वच्या सर्व अद्यापही बंद अवस्थेत असल्याने संबंधित अधिकारी व पदाधिकार्यांनी यंत्र खरेदीत संबंधीत कंपनीशी केलेला आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याने यामध्ये लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप करून विकासाच्या नावाखाली भकास करणाऱ्या संबंधितांची कसून चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी निंगनूर येथील सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दिन सौदागर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे .
तहानलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी अशा गावांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत शुद्ध पाणी देण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली परंतु शासनाच्या या धोरणाला हरताळ फासण्याचे काम संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले असल्याचा आरोप निंगनूर येथील सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दिन सौदागर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे . जि प वार्षिक योजना जनसुविधा सन 2019 - 2O अंतर्गत निंगनूर गावात प्रत्येकी 12 लाख 43 हजार रुपये किंमतीचे तांडा वस्ती व गावातील हनुमान मंदीरा समोर सौर उर्जेवरील (वॉटर फिल्टर )जल सुविधा यंत्रे बसविण्यात आली तेव्हा पासून सदर यंत्रे अद्यापही बंदच असल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गावकऱ्यांना तहान शमविण्यासाठी शुद्ध व थंडगार पाणी मिळू शकले नाही . याकडे कुठल्याही अधिकार्याचे अथवा लोक प्रतिनिधीचे लक्ष नाही . प्रत्येकी 12 लाख 43 हजाराचे सदर बंद यंत्रे शोभेची वास्तू बनल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . बोगस कंपनीकडून यंत्र खरेदी करून संबंधित अधिकारी व पदाधिकार्यांनी लाखो रुपयांची दलाली हडपल्याचा दाट संशय येत असल्याने तालुक्यात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या या वॉटर फिल्टर खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची कसून चौकशी करून संबंधितां विरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी मागणी मैनुद्दिन सौदागर यांनी निवेदनातून केली आहे .
॥ प्रतिक्रिया ॥
सौर उर्जेवरील जलसुविधा यंत्र (वॉटर फिल्टर )खरेदी ही जिल्हा परिषद फंडातून झालेली असल्याने पं.स. ला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार जि . प . कडे चौकशी करीता पत्रव्यवहार केला आहे .
प्रविणकुमार वानखेडे
गटविकास अधिकारी उमरखेड