स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत उमरखेड तालुका प्रशासनाच्यावतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन
उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
उमरखेड तालुका प्रशासनाच्यावतीने तहसील कार्यालय उमरखेड येथे आज दिनांक १५ जून २०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे त्या निमित्ताने तहसील कार्यालय उमरखेड येथे तालुका प्रशासनाच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित केले. व्यंकट राठोड ( उपविभागीय अधिकारी उमरखेड), आनंद देऊळगावकर (तहसीलदार उमरखेड) यांनी सदर शिबिराचे आयोजन केले याप्रसंगी व्यंकट राठोड उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.
सदर शिबिरास अनेक सामाजिक संघटना, शहरातील नागरिक तसेच कामानिमित्त बाहेर गावाहून आलेले नागरिक , कार्यालयातील समस्त कर्मचारी यांनी सहभाग घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण तर होतेच त्याचबरोबर गरजू व्यक्तींना वेळीच रक्त मिळालं मुळे त्याचे प्राण वाचतात त्यामुळे रक्तदान करणे हे सामाजिक कार्य असल्याचे प्रतिपादन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले.
सदर शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र घेऊन सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. या महा रक्तदान शिबिराचे यशस्वितेकरिता तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.