Type Here to Get Search Results !

फलटण | श्री वाघेश्वर पतसंस्थेकडुन असंख्य ठेवीदारांची बेहिशोबी फसवणूक ; ठेवीदारांसाठी फलटण तालुका शिवसेना मैदानात

श्री वाघेश्वर पतसंस्थेकडुन असंख्य ठेवीदारांची बेहिशोबी फसवणूक ; ठेवीदारांसाठी फलटण तालुका शिवसेना मैदानात




मागील काही दिवसामध्ये फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे ग्रामस्थांनी श्री वाघेश्वर पतसंस्थेकडुन फसवणूक झाल्याची तक्रार शिवसेना फलटण तालुका जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे केली होती. तेव्हा प्रत्येकाकडुन माहिती घेतली असता, कोणाच्या ठेवीची मुदत संपली आहे, कोणी रोज थोडे थोडे पैसे पिग्मी खात्यांतर्गत ठेवले आहेत, तर कोणाची बचत खात्यात रक्कम अडकली आहे. ठेवीदारांनी पतसंस्थेत पैसे ठेवी स्वरुपात ठेवल्याच्या श्री वाघेश्वर पतसंस्थेच्या नावाचे छापील पासबुक, ठेव पावत्या आदी पुरावे देखील ठेवीदारांकडे उपलब्ध आहेत. श्री वाघेश्वर पतसंस्थेत स्वतःचे पैसे ठेवीच्या खात्यामध्ये असुनही पैसे मिळत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे संबंधितांकडुन दिली जात आहेत. आम्ही कष्ट करुन कमवलेले पैसे थोडे थोडे करुन वाघेश्वर पतसंस्थेत एक दिवस मोठी रक्कम मिळेल या आशेवर ठेवले होते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी ठेवीदारांच्या असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.




सदर विषयात ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ठेवीदारांसह फलटण तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक अधिकारी सुनिल धायगुडे यांची भेट घेतली व श्री वाघेश्वर पतसंस्थेची योग्य ती चौकशी करुन ठेवीदारांना त्यांच्या रकमा मिळवून द्याव्यात अशा मागणीचे पत्र फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने ठेवीदारांसह देण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 21 अन्वये श्री वाघेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्या. जाधववाडी या संस्थेचे नोंदणीकरण रद्द केले असल्याचे फलटण तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक सुनिल धायगुडे यांनी स्पष्ट केले. तसेच दिनांक 27 मार्च 2019 पासुन सदर संस्थेचे एक व्यक्तीभुत संस्था म्हणुन तिचे अस्तित्व संपुष्टात आले असल्याच्या आदेशाची प्रत सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांनी दिली असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.




त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना असंख्य ठेवीदारांची बेहिशोबी फसवणूक झाली असल्याची माहिती देऊन ठेवीदारांच्यावतीने एक तक्रारी अर्ज दिनांक 26 मे 2022 रोजी देण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील ठेवीदारांना न्याय मिळाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही अशी आक्रमक भुमिका शिवसेनेने घेतलेली आहे.


(MPID act 1999 section 4) महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत ठेवीदारांची बेहिशोबी फसवणूक करणा-या श्री वाघेश्वर पतसंस्था व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन फलटण तालुक्यातील ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी मागणी फलटण तालुका शिवसेना व ठेवीदारांच्यावतीने शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचेकडे केली आहे. त्यावर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे ठाम आश्वासन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News