शिवणी व सावरगाव तांडा येथे रसायनमिश्रित सिंधी खुले आम विक्री
किनवट :- गजानन वानोळे
इस्लापूर सर्कल मधील शिवणी व सावरगाव तांडा येथे रसायन मिश्रित सिंधी दररोज टाक्याने खुले आम विक्री होत आहे सिंधी विक्री करणाऱ्याला बंदी असून सुद्धा खुलेआम विक्री करत आहेत याला कोणाचीही भीती व भय नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे. या सिंधी विक्रेत्यावर कोणाची कृपा दृष्टी आहे असा संदेह जनतेमध्ये होत असुन, सावरगाव तांडा व शिवणी ग्रामपंचायत येथील कार्यालयाच्या बाजूस रसायनमिश्रीत शिंदी खुलेआम विक्री चालू आहे या रसायनमिश्रित सिंधीमुळे लहान-मोठे वृद्ध सर्वच आहारी लागल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. व त्यांचे जीव धोक्यात येत असून या सिंदी विक्रेत्याला कुणाचा आळा नाही असा प्रश्न परिसरातील जनतेला पडला आहे.
रसायनमिश्रीत सिंधी पिऊन लहान थोर नशेच्या आहारी जात असल्याने रात्र दिवस सिंदी पिऊन सिंधीच्या नशेत राहून मतीमंद होत आहे सिंधीमूळे कुठल्याही प्रकारचे भान राहत नसल्याने, रसायन मिश्रित सिंधी नशेच्या गोळ्याने व पावडर मुळे बनवतात असे जनतेमधून चर्चा ऐकावयास मिळत आहे. या सिंधी विक्रेत्यावर कोणाचाच ताबा नाही व पोलिस प्रशासन सुध्दा याकडे दुर्लक्ष देत नाही, दुरभाग्य समजायचे का? अशी ,जनता जनार्धन कडून चर्चेला उधाण लागले आहे.