निंगनुर येथे वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली,पिकांचेही नुकसान
प्रतिनिधी निंगनूर : मैनोदिन सौदागर ता.उमरखेड. जि.यवतमाळ
निंगनूर येथे व परिसरात दि 24 चे सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाल्याने अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली .अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली व वादळामुळे गावातील घरांची प्रचंड नासधुस होऊन नुकसान झाले .
केळी सह शेतीतील पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे . केळी बागांना मात्र जबर फटका बसला आहे .तुफान वादळामुळे गावामधील अनेक मोठी झाडे उन्मळून कोसळली मात्र सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही .