बुद्धेहाळ विकास सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन सचलकांचा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते मा.डॉ.बाबासाहेब (भैया) देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न.
बुद्धेहाळ गावच्या सोसायटीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला बिनविरोध बहुमत यश मिळून वर्चस्व व सत्तास्थान अबाधित राहिले आहे.
स्व. आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांच्या विचारांच्या व जेष्ठ नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख , युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख , युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी व बुद्धेहाळ शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी यांनी आपली विकास सेवा सोसायटी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला व शेकाप च्या स्थानिक नेते मंडळींनी घवघवीत यशस्वीरित्या यश संपादन केले आहे. तसेच ७० वर्षाची परंपरा अबाधित राखली आहे.
शेकाप जेष्ठ नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख , युवा नेते मा.डॉ बाबासाहेब देशमुख , युवा नेते मा.डॉ अनिकेत (भैया) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाला यशस्वी रीतसर बिनविरोध बहुमत मिळाले आहे.
बुद्धेहाळ विकास सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध घवघवीत यश मिळवले आहे. ७० वर्षांची सत्तास्थान अबाधित राखली आहे
शेकाप युवा नेते मा.डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते नूतन सचालकांचा सत्कार करण्यात आला.
नूतन संचालकांची नावे :-
१)पांडुरंग कृष्णा लवटे (सर)
२)अंकुश रामचंद्र लवटे
३)रावसाहेब महादेव लवटे
४)गंगुबाई शिवाजी लवटे
५)भारत सुखदेव लवटे
६)त्रिंबक रामचंद्र कोळेकर
७)बाळकृष्ण रामू काळे
८)शामराव बिरा जावीर
९)तुकाराम नामदेव गळवे
१०)सोपान पाडुरंग निमंग्रे
बुद्धेहाळ विकास सेवा सहकारी सोसायटी
बुद्धेहाळ शेतकरी कामगार पक्षाला घवघवीत यश मिळवून उमेदवार बिनविरोध संचालक विजयी झाले.
शेकाप युवा नेते मा.डॉ बाबासाहेब देशमुख यांचाही बुद्धेहाळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार जल्लोषात करण्यात आला.
आणि नूतन संचालकांना मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांनी व डॉ बाबासाहेब देशमुख यांनीही स्व. आमदार डॉ गणपतरावजी नदेशमुख आबासाहेब यांचे विचार व कार्य शेवटच्या घटकांपर्यंत असेच पोचवावे. त्या पद्धतीने आपले कार्य चालु राहो , व ग्रामस्थांनी शेकापवर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहुन कामकाज करण्यास पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी उपस्थित :- बुद्धेहाळ (करांडेवाडी) गावचे आजी माजी सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आजी माजी चेअरमन , व्हा. चेअरमन व पदाधिकारी , गावातील व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.