Type Here to Get Search Results !

डिपी आला पण शेतपीके गेली : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख अत्यंत धक्कादायक

डिपी आला पण शेतपीके गेली : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख अत्यंत धक्कादायक




फलटण प्रतिनिधी

मलवडी येथील बिचुकले वस्ती डिपी व नांदल येथील मुळीकवाडी हद्दीतील कोळेकर वस्ती डिपी नादुरुस्त असल्याकारणाने तेथील स्थानिक शेतक-यांनी फलटण शहरातील शिवसेना फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन शेतपीकाचे नुकसान होत असुन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याबाबतची तक्रार केली होती. शेतक-यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर लगेचच तत्परतेने फलटण तालुका वीज महावितरणचे मुख्य अभियंता मकरंद आवळेकर, सह मुख्य अभियंता गणेश जमाले, वाठार निंबाळकर विभागातील वीज महावितरणचे अधिकारी सुरेश कुंभार व आदर्की विभागाचे अधिकारी इराबत्ती यांना तात्काळ मोबाईलवरुन संवाद साधत संबंधित दोन्ही ठिकाणी बंद पडलेले ट्रान्सफार्मर सुरु करण्यासाठी सांगितले व डिपी सुरु होईपर्यंत त्याचा गांभीर्याने पाठपुरावा केल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

मलवडी येथे दोन वेळा नवीन डिपी जोडावा लागला, तर नांदल येथे तीन वेळा. मलवडी येथे नादुरुस्त डिपी वीज महावितरणने काढुन तेथे नवीन दुरुस्त डिपी जोडल्यानंतर काही वेळातच त्यातुन धुर निघायला सुरुवात झाली. नवीन डिपी नादुरुस्त झाल्यानंतर चार दिवसानंतर दुसरा डिपी जोडण्यात आला. दुसरीकडे नांदल येथील मुळीकवाडी हद्दीतील नादुरुस्त कोळेकर वस्ती डिपी काढुन नवीन डिपी बसवण्यासाठी आणण्यात आला होता. पण बसवण्याअगोदरच त्यातुन ऑईल गळती सुरु झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर डिपी त्वरीत माघारी पाठवण्यात आला. त्यानंतर लगेच दुस-या दिवशी दुसरा नवीन डिपी जोडण्यात आला. तो दुस-या दिवशीच बंद पडला. पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने आज दिनांक 7 मे 2022 रोजी तिसरा नवीन डिपी जोडण्यात आला असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

फलटण वीज महावितरणच्या घळमाटे व ढिलेपणामुळे मलवडी येथील बिचुकले वस्ती डिपीचा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी वीस दिवस लागले. तर नांदल येथील मुळीकवाडी हद्दीतील कोळेकर वस्ती डिपीचा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी पंचवीस दिवस लागले. वीज महावितरणच्या तालुका अधिकारी, स्थानिक विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी खरोखर गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. कडक उन्हाळ्यात शेतक-यांची शेतपीके एवढे दिवस डिपीअभावी पाण्याशिवाय जगू शकतील का ? दोन्ही ठिकाणी शेतपीकांचे वाटोळे झाले आहे. प्रत्येक शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता याला जबाबदार कोण ? याची जबाबदारी कोण घेणार ? शेतात केलेले कष्ट, शेतपीके घेण्यासाठी खर्च केलेले भांडवल व शेतात डिपी अभावी पाण्याशिवाय उभे जळालेले पीक फलटण वीज महावितरण माघारी आणुन देणार का ? दिरंगाई व बेजबाबदारपणाने कामे करणा-या वीज महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांचे पगारातुन शेतक-यांचे नुकसान का वजा करण्यात येऊ नये. फलटण तालुका वीज महावितरणची काम करण्याची पद्धती सुधारली नाही तर शिवसेना स्टाईलने दांडके हातात घेऊन शेतक-यांसह संपुर्ण फलटण तालुक्यात न भूतो न भविष्य असे तीव्र आंदोलन शिवसेना हाती घेईल अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी व्यक्त केली.

फलटण तालुक्यातील शेतक-यांनी इथुन पुढे, डिपी नादुरुस्त झाला असल्याचे समजताच शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद झाल्याचे पत्र वीज महावितरणच्या वायरमन अथवा तेथील स्थानिक विभागाचा अधिकारी यांना देऊन छायांकीत प्रतीवर त्यांची पोहोचपावती म्हणून तारीख, सही व शिक्का घ्यावा. वीजबीले अजिबात थकीत ठेऊ नका. मीटरप्रमाणे वीज बील भरायचे आहे. सरासरी व अवाजवी प्रमाणात आलेली वीज बीले अजिबात भरायची नाहीत. दोन दिवसाच्या आत नवीन डिपी जोडुन वीज पुरवठा सुरळीत करुन देणे वीज महावितरण कार्यालयास बंधनकारक आहे. मग समस्या वीज महावितरणची असो वा कोणत्याही क्षेत्रातील असो, फलटण तालुका शिवसेना फलटण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नम्रपुर्वक कटीबद्ध आहे. कोणतीही समस्या असल्यास तात्काळ संपर्क करा. फक्त समस्या योग्य हवी. फलटण तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथे आयसीआयसीआय बँकेसमोर मोनिता गार्डनमध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे. कोणतीही समस्या असल्यास शिवसेना कार्यालयास भेट द्या असे नम्र आवाहन शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे 8600138961 व 7774096430.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad