जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एमबीबीएस पूर्ण केलेल्या व निवड झालेल्या डॉक्टर तरुणांचा यांचा सत्कार संपन्न
माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील जिजाऊ बहुुद्देशीय संस्थेच्या वतीने एमबीबीएस पूर्ण केलेल्या दोन डॉक्टर तरुणांचा सत्कार करण्यात आला.चैतन्य बिभिषण चौगुले यांनी MBBS अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांचा व तेजस बापू वाघमोडे याने
अत्यंत चिकाटीने अभ्यास करून वैद्यकीय प्रवेश परिक्षेमध्ये ५५५ गुण मिळवून पहील्याच प्रयत्नात वैद्यकीय महाविद्यालय, नंदूरबार येथे प्रवेश मिळविल्याबदल सत्कार करण्यात आला.
रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून काम करण्याचे व अंजनगावातील लोकांसाठी विविध
शिबीराचे आयोजन करून गरजूंना योग्य ती मदत करणार असल्याचे चैतन्य बिभिषण चौगुले यांनी सांगितले
तसेच तेजसने याने सांगितले की, अंजनगाव मधून जास्तीत जास्त मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी मुलांबरोबर संपर्क साधणार असल्याचे सांगितले. अभ्यासात सातत्य व वेळेचे नियोजन केल्यास यश नक्कीच मिळते.परीस्थीतीचा बावू न करता अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशाला गवसणी घालता येते.
अंजनगावसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. गावातील इतर मुलांनीही या मुलापासून प्रेरणा घ्यावी व अंजनगावचा नावलैलिक वाढवावा, यासाठी जिजाऊ बहुउद्देशीय संस्था अनेक उपक्रम राबवीत आहे.
गावातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चैतन्य व तेजस यांच्यापासून प्रेरणा घेवून वैद्यकीय क्षेत्रात यावे व जनसेवा करावी. त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व अंजनगावकरांच्या हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या