ता.२०/५/२०२२
वाळुंजनगर (लोणी) ता.आंबेगाव
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, युवकांचे नेते मा. विवेकदादा वळसे पाटील (उपाध्यक्ष, शरद सहकारी बँक) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज भीमाशंकर सहकारी साखर कारखाना युवा संचालक मा. प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अंकीत जाधव, मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहासभाऊ बाणखेले, मा.सरपंच महेंद्र वाळुंज, उपसरपंच अण्णा पोखरकर, मयुर सरडे, दिलीप लोखंडे तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबेगाव तालुका प्रतिनिधी कैलास गायकवाड