ग्राम पंचायत मार्लेगांव ने घेतली विद्यार्थीनीच्या अर्जाची दखल .
ऊमरखेड :-संजय जाधव
जि.प.शाळा मार्लेगांवच्या विद्यार्थीनी प्राची, कल्यानी , अक्षरा व संजिवनी वर्ग ४ था ह्यानी त्यांच्या वर्गात पंख्याची अवश्यकता असल्याचा लेखी अर्ज दि १८ एप्रील ला वर्गशिक्षिका फुंदे मॅडम च्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका आडे मॅडम याना दिला होता मुख्याध्यापिका यांनी तो विनंती अर्ज शाळेत घडणाऱ्या चांगल्या घटना पालकांना अवगत व्हाया ह्यासाठी अध्यक्ष गजानन शिंदे ह्यांचे संकल्पनेतुन बनविण्यात आलेल्या पालकांचा वाट्स ॲपग्रुप "माझी शाळा माझी जबाबदारी " ह्या वर टाकला
.त्याची दखल ग्राम पंचायत सदस्या सौ मिराबाई माधव कदम यानी घेतली व त्यांनी ग्रामपंचायत मिटींग मध्ये हा विषय मांडला उपस्थित सरपंच , उपसरपंच व सदस्य हयानी तो उचलुन धरला व सरपंच सचिव ह्यांनी ग्राम पंचायत ला ३ पंखे घेवुन देण्याचे ठरले . चिमुकल्यानी केलेल्या अर्जाने किमया केली .तिन पंखे काही दिवसापुर्वी ग्रामपंचायत ने शाळेला सुपूर्द केले त्यांच्या वर्गातही पंखा बसविण्यात आला. आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात त्याचेच समाधान व्यक्त करण्या साठी ग्राम पंचायत ने केलेल्या सहकार्या बद्दल स्वयंप्रेरणेनी बोलण्याचे धाडस करून कु प्राची कदम वर्ग ४ था ही समोर आली व विद्यार्थी गावकरी यांचे समोर येवुन म्हणाली "
उन्हामुळे आम्हाला खुप गर्मी होत होती मी व माझ्या मैत्रीनीने चर्चा करुण अर्ज लिहला तो मुख्याध्यापिका माया आडे मॅडम याना दिला . मुख्याध्यापिका आडे मॅडम , आमचे अध्यक्ष गजाननराव शिंदे , सरपंच , उपसरपंच व सर्व सदस्यांचे आभार मानते . आपल्या सारखे कर्तृत्ववान मानस आमच्या शिक्षणा कडे विशेष लक्ष देत आहात . खरोखरच आम्ही खुप भाग्यवान आहोत. पुन्हा एकदा सर्वाचे आभार मानते धन्यवाद . जय महाराष्ट्र जय भारत ."
एका अर्जाची दखल घेवुन शाळेसाठी तातडीने तिन पंखे उपलब्ध करुण दिल्या बद्दल अध्यक्ष गजानन शिंदे व उपाध्यक्ष विनायक कदम यांनी जयनारायण नरवाडे सरपंच , सि.डी कदम उपसरपंच,झासकर मॅडम सचिव , मिराबाई कदम सदस्या , रामेश्वर शिंदे सदस्य , यांचे शाळेच्या अर्जाची दखल घेतल्या बद्दल आभार मानले . असेच लक्ष शाळेवर ठेवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली .
मार्लेगांव ग्राम पंचायत सारखे शाळेच्या भौतीक व शैक्षणिक प्रगतीसाठी लक्ष दिल्यास गावो गावी नक्कीच जि.प शाळेचा कायापालट होईल असे अध्यक्ष गजानन शिंदे म्हणाले . प्राची , कल्यानी , अक्षरा , संजिवनी ह्यानी दिलेल्या अर्जाचे कौतुक सर्वानी केले .