प्रवक्त्या निपुर शर्मा यांच्यावर एफ आय आर दाखल . वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी
एम आय एम ची तक्रार
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात उमरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं शर्मा यांच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली असा आरोप करत एम आय एम पक्षाच्यावतीने स्थानिक पोलिस स्टेशन उमरखेड येथे तक्रार करण्यात आली .
टिव्ही चैनल टाईम्स नाऊ वरती डिबेट सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी इस्लामचा व पैगंबर मोहम्मद यांचा हेतुपुरस्कर अपमान केल्याबाबत एम आय एम जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान सय्यद युसुफ यांनी दि 29 मे रोजी तक्रार दिली तसेच दोषींवर कठोर कारवाई करून त्वरीत अटक करण्यात यावी
नुपुर शर्मा दूर्भावनापूर्ण पणे इस्लाम धर्माचा अपमान केला व विशेषता प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरले व प्रत्येक मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या कारण मुस्लिमांसाठी सर्वात प्रिय आणि आदरणीय म्हणजेच मोहम्मद पैगंबर आणि कुराण मध्ये नमूद केलेल्या धार्मिक श्रद्धेचा अपमानास्पद खोटे आणि मन दुखवणारे शब्द वापरले व पैगंबर मोहम्मद यांच्याविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या नुपुर शर्मा व टाइम्स नाऊ टीव्ही चॅनलच्या संपादकास तात्काळ अटक करावा करिता पोलीस स्टेशन उमरखेड येथे एम आय पक्षाच्यावतीने तक्रार देण्यात आले यावेळी एम आय एम जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान सय्यद युसूफ, माजी नगरसेवक मुजीब बागवान ,माजी नगरसेवक अफसर भाई ,माजी नगरसेवक रसूल पटेल, अजिज पटेल, वझाहत मुजावर ,शेख असलंम समीर शॅम, अहमद पटेल,सय्यद फराज हे उपस्थित होते .
उमरखेड पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात दि 29 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला नूपुर शर्मा यांच्या विरोधात कलम भादवि 295 अ ,153 अ ,अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे .
प्रतिनिधी निगंनूर मैनोदिन सौदागर .