किनवट/ गजानन वानोळे
अप्पाराव पेठ ग्रा. प. चे सरपंच ऐलया कोतलगाव यांना जिल्हा अधिकाऱ्यांनी केले बडतर्फ.
तालुक्यात बहुचर्चित असलेल्या अप्पाराव पेठ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच यांने शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य पदावरून काम करण्यास अपात्र असल्याचे डॉक्टर विपिन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड यांनी घोषित केले .
अप्पाराव पेठ येथील रहिवासी मारोती मुंजाजी देशमुखे यांनी येथील सरपंच ऐलया कोतलगाव यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शासनाची मालमत्ता ताब्यात घेतले असल्याची तक्रार जिल्हा अधिकारी यांचेकडे दाखल केली होती. संबंधित जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटणकर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही बाजूने चौकशी करण्यास सुरुवात केली. किनवट येथील तहसीलदार यांना लेखी पत्राद्वारे कळवून संबंधित तक्रारीचे गांभीर्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
असता तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी अप्पाराव पेठ या ठिकाणी जाय मोक्यावर जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली . येथील शासकीय जमीन गट नंबर 765 मधील 58 आर जमिनीवर सरपंचाचे कुटुंबातील व्यक्तीने अतिक्रमण केलेले निष्पन्न झाल्याचे अहवाल नांदेड जिल्हा अधिकारी यांना पाठवून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधितांना नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्याची संधी सुद्धा दिली.
पण सरपंचाची बाजू या ठिकाणी कमकूवत पडली व अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यामुळे येथील सरपंच ऐलया कोतलगाव यांना शिल्लक राहिलेल्या कालावधीसाठी अप्पारावपेठ ग्रामपंचायत सदस्य व सरपंच या पदावरून बडतर्फ करण्यासंदर्भात कारवाई केली असल्याची लेखी पत्र जिल्हाधिकार्यांनी दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली व तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाची धास्ती घेतली असून अतिक्रमण केलेले केलेल्या सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अशा प्रकारच्या कारवाईचा बडगा अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांवर होणार या धास्तीने अनेक सदस्य तालुक्यामध्ये चिंता ग्रस्त असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे . या प्रकरणात अर्जदार मारोती मुंजाजी देशमुख यांच्या वतीने ऍड.एन. जे .काकडे यांनी काम पाहिले.