फलटण तालुक्यातील जनतेची सेवा करणे हेच शिवसेनेचं हिंदुत्व : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
फलटण तालुक्यातील द-याचीवाडी गावातील स्थानिक शेतक-यांनी वागजाई डिपी बंद असलेबाबतची तक्रार शिवसेना जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेटुन शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे केली होती. तक्रारी नुसार सदर डिपीतुन सहा महिन्यापूर्वी ऑईल गळती सुरु होती. परंतु तरीदेखील वीज महावितरणने कोणतीही दखल घेतली नाही.
ना गळती बंद केली ना डिपीमध्ये ऑईल दिले. शेवटी स्थानिक शेतक-यांनी प्रत्येकी पाचशे रुपये गोळा करत एकुण सहा हजार पाचशे रुपये वायरमन यांच्याकडे ऑईल आणण्यासाठी जमा केले. त्यानंतर ऑईल डिपीत सोडण्यात आले. परंतु वीज महावितरणने डिपीमधुन होत असलेली ऑईल गळती बंद न केल्यामुळे डिपीमधील ऑईलची पातळी कमी होऊन डिपी नादुरुस्त झाला.
सातारा जिल्हा वीज महावितरणचे अधिक्षक गायकवाड व फलटण तालुका वीज महावितरण मुख्य अभियंता मकरंद आवळेकर यांचेकडे याबाबत तक्रार करुन सदर डिपी तात्काळ बसवण्याची मागणी केली. शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्याची गांभीर्याने दखल घेत तात्काळ डिपी बसवण्यात आला असल्याची माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे शिवसेनेच्या माध्यमातून मागील प्रदीर्घ कालावधीपासुन फलटण तालुक्यातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत व त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. मग समस्या कोणतीही असो, कोणत्याही क्षेत्रातील असो.
अन्याय व समस्येने त्रस्त झालेल्या फलटण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सामान्य जनतेला हक्काचे व्यासपीठ देत फलटण शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी तालुक्याचे "शिवसेना जनसंपर्क कार्यालय" उभे करुन देण्याचे अनमोल कार्य शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे. अन्यायी कार्यपद्धतीवर दंड थोपटून मैदानात उतरल्यामुळे नागरिकांना न्याय मिळत असुन नागरिक आनंदी दिसत असल्याची भावना फलटण तालुक्यातील जनता व्यक्त करत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, फलटण तालुक्यातील जनतेची सेवा करणे हेच शिवसेनेचं खरं हिंदुत्व असल्याचे स्पष्ट करुन शिवसेनाच खरा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी ठासुन सांगितले.