Type Here to Get Search Results !

किनवट | जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या उप-अभियंत्याची तात्काळ बदली करा - सामाजिक कार्यकर्ते संदिप नखाते

जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या उप-अभियंत्याची तात्काळ बदली करा - सामाजिक कार्यकर्ते संदिप नखाते




किनवट: गजानन वानोळे

किनवट:- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे उप- अभियंता त्यांच्या अनियमित कामाने कळस गाठला असून किनवट आदिवासी तालुका हा आदिवासी पैसाक्षेत्र असून आदिवासी बहूल समाज असून संबंधीत अधिकऱ्याची येथून तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे.

सदर उप-अभियंता हे आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोणातून निरुउत्साही आहेत. मागील आर्थीक वर्षात यांंनी टंचाईचे कामे केली नसल्याने शासनाचा निधी परत केला सामाजिक कार्यकर्ते सरपंच, ग्रामसेवक यांच्या सततच्या तक्रारीमुळे मागील वर्षी ग्रामसेवक संघटना, सरपंच संघटना यांच्या गंभीर तक्रारीवरून त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली होती. त्यांनी वरिष्ठ् पातळीवर धाव घेवून स्थगिती मिळविली, पुन्हा सुढबुध्दीने आदिवासी समाजास त्रास देण्याच्या उद्देशाने किनवट येथे पुन्हा रुजू झाले पुन्हा तालुक्यातील विकासकामांना खिळ बसली आहे.


सद्या परिस्थीतीत तिव्र उन्हामुळे पाणी टंचाई, जलजीवन मिशन अंतर्गत कामे मग्रारोहयोची कामेही विकास कामे १५ वित्त आयोग पैसा योजना अंतर्गत विकास कामावर परिणाम होत आहे. दि. ०१एप्रिल २००४ रोजी किनवट येथे उपस्थित झाल्यापासुन तालुक्यातील विकासकामांना त्यांनी भेटीच दिल्य्या नाहीत व विकासकामाच्या मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी सुध्दा केले नाहीत त्यामुळे तक्रारी वाढत आहेत. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते उत्तर देत नाहीत. कार्यालयातही अभावानेच भेटता त्यामुळे विकास कामांना गती मिळण्यासाठी संबंधीताची त्वरीत बदली करण्यात यावी.



विकास कामाची जाण असलेल्या सक्षम उप- अभियंताची ये हैथे नियुक्ती करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्याचा मनोदय सामाजिक कार्यकर्त्ते संंदिप नखाते याांनी बोलून दाखविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad