सेलु येथे आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 मृद व जलसंधारण अंतर्गत पाझर तलावासाठी 1 कोटी निधी मंजूर झाला असुन आमदार राजुभैया नवघरे यांनी मान्यवरांसह पाझर तलावाचे भूमिपूजन केले. हा पाझर तलाव 14 एक्कर वर निर्माण होत असुन याची Capacity 80 tcm एवढी आहे व सिंचन क्षमता 17 हेक्टर आहे.
परिसरातील नागरिकांची 25 वर्षांची इच्छा पूर्ण झाली असुन मनोगतात त्यांनी आ. राजुभैया नवघरे यांचे आभार मानले.
या पाझर तलावामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेती व शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. या तलावामुळे निसर्ग सौंदर्य तर वाढेलच पण पर्यावरणाला ही याचा मोठा लाभ होईल.
पर्यावरणात बदल होत चालले आहेत पडणाऱ्या पावसाचे पाणी संवर्धन करून त्याचा जमिनीत पाझरा करणे ही आता काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने हा पाझर तलाव महत्त्वपूर्ण आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास मामा भोसले होते,यावेळी सभापती तानाजी बेंडे पाटिल,तालुकाध्यक्ष ञ्यंबक कदम ,बालुमामा ढोरे ,उत्तम कदम तात्या ,नितीन महागांवकर ,चंन्द्रकांत दळवी ,मुंजाजीराव दळवी,प्रशांत शिंदे ,देविदास चव्हाण,सचिन भोसले, भगवान दळवी ,उत्तमबाबा भोसले ,एन आय पठाण ,शेख मोहसीन ,बालाजी जाधव ,महेशहोडगिर ,बंटी जाधव ,अमोल इंगोले ,गजानन दळवी डोणवाडेकर ,ब्रम्हानंद वसमतकर ,संतोष मगर ,बालाजी भोसले उपस्थित होते.