Type Here to Get Search Results !

लिंगी ते सातेफळ पांदन रस्त्याचे भूमिपूजन आ.राजू भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले

लिंगी ते सातेफळ पांदन रस्त्याचे भूमिपूजन




वसमत तालुक्यातील लिंगी ते सातेफळ गावाकडे जाणारा पांदन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे भूमिपूजन वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिंगी गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजू भैया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला.



या पांदन रस्त्यामुळे लिंगी ते सातेफळ गावच्या शेतकऱ्यांना दळणवळण सोयीस्कर होणार असल्याने लिंगी सातेफळ गावकऱ्यांनी आमदार राजू भैया नवघरे यांचे आभार मानले. या कार्यक्रमप्रसंगी सभापती तानाजी बेंडे, अध्यक्ष बालाजी यशवंते, सरपंच साहेब बाबुराव गायकवाड, उपसरपंच पांडुरंग सोळंके, ऋषिकेश चिलवंत, पंडित शिवभगत, गोविंद यशवंते, एन आय पठाण सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad