Type Here to Get Search Results !

मातोश्री कै.पुष्पाताई महल्ले यांच्या स्मरणार्थ वाचनालय स्थापन करून गोदावरी फाउंडेशनला ५ लक्ष निधी ; राजश्री पाटील यांनी समाजासमोर ठेवला आर्दश

मातोश्री कै.पुष्पाताई महल्ले यांच्या स्मरणार्थ वाचनालय स्थापन करून गोदावरी फाउंडेशनला ५ लक्ष निधी ; राजश्री पाटील यांनी समाजासमोर ठेवला आर्दश



महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
यवतमाळ : गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या मातोश्री कै.पुष्पाताई बाबासाहेब महल्ले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून सारंगपूर येथे स्वखर्चातून राहत्या घरी वाचनालय स्थापन केले आणि गावाच्या विकासासाठी ५ लक्ष रुपयांचा वैयक्तिक देणगी देऊन सृजनशील उपक्रमाची सुरुवात केली. खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून या वैविध्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुण्यतिथी, स्मृतिदिनानिमित्त करण्यात येणाऱ्या इतर खर्चाला बगल देत राबविलेल्या या उपक्रमामुळे जणू आदर्शच उभा राहिला आहे. यावेळी आई वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना राजश्री पाटील भावूक झाल्या होत्या. तसेच यापुढेही गावविकासासाठी गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.


   गतवर्षी कोरोनाच्या काळात गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या मातोश्री कै .पुष्पाताई बाबासाहेब महल्ले यांचे अचानक निधन झाल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला होता. आयुष्यात आई आणि वडील सोबत असल्याने माणसाला जगण्यासाठी उमेद निर्माण होते . राजश्री पाटील यांच्या आई वडिलांनी गावासाठी समाजासाठी आपलं आयुष्य वेचले . त्यांचाच आर्दश आणि संस्कार घेऊन राजश्री पाटील हि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत .आई गेल्यानंतर त्यांनी नांदेड मध्ये रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी " शिदोरी " हे अन्नछत्र सुरु करून सामाजिक बांधिलकी जपली होती . वडील सामाजिक आणि समतावादी विचारसरणीचे असल्याने त्यांची ईच्छा होती आपण राहत असलेल्या गावात एखादं वाचनालय असावं आणि याच अनुषंगाने त्यांचे माहेर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सारंगपूर येथे आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वाचनालय स्थानप केले 

या वाचनालयाच्या संयोजनाची जबाबदारी गावातील वाचनालय स्थानिक सल्लागार समितीकडे देण्यात आली आहे.तसेच खासदार हेमंत पाटील यांनी गावाच्या विकासासाठी ५ लक्ष रुपयाचा निधी दिला. यावेळी राजश्री पाटील बोलताना म्हणाल्या कि, आज मी जे काही आहे ते केवळ माझ्या आई वडिलांच्या संस्कार आणि पाठबळामुळेच आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करताना मन भरून येत आहे तसेच आपण आपल्या गावाच्या विकासात खारीचा वाटा उचलत आहोत याचे समाधान वाटत आहे असे म्हणत त्यांनी आई वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी अश्रू अनावर झाले होते . यावेळी नेर चे तहसिलदार शिवाजीराव मगर बोलतांना म्हणाले कि, पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवत असतात आणि घडलेले मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नाही एवढी ताकद पुस्तकामध्ये आहे थोडक्यात काय तर पुस्तकं कि माणसाला जगण्याची जिद्द आणि प्रेरणा देतात. समाजात आजवर उच्चपदावर गेलेले नामवंत लोक केवळ वाचनामुळे गेले आहेत राजश्री पाटील यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरु केलेला वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम असून असे सामाजिक उपक्रम गावागावात झाले पाहिजे यामुळे आपली येणारी पिढी नक्कीच उज्वल असेल यात दुमत नाही . राजश्री पाटील यांच्या आई वडिलांचे कर्तृत्व खरचं खूप मोठे होते त्यांनी सदैव आपल्या गावाचा , समाजाचा विकास व्हावा उभा उद्देशाने काम केले आणि तोच वसा त्या पुढे नेत आहेत य वडिलांना अभिमान वाटावा अशी वाचनाची चळवळ त्या उभी करत आहेत . तसेच यावेळी गावकऱ्यांनी सुद्धा कै बाबासाहेब महल्ले आणि कै . पुष्पाताई महल्ले यांच्या आठवणींना उजाळा देताना प्रशांत निमकर म्हणाले कि, राजश्री पाटील यांच्या आई वडिलांना आम्ही माई आणि अप्पाजी म्हणत असो त्यांचे विचार हे समतावादी होते . म्हणूनच त्यांनी मुलामुलींमध्ये भेद न करता त्याच्या मुलीला उच्च शिक्षण दिले आणि आपल्या सामाजिक कार्याची बीजे त्यांच्यामध्ये रोवली आज त्या रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे . त्यांचे घर आमच्यासाठी पूर्वीपासूनच वाचनालयासारखे भासत होते आमचे बालपण आणि विचारांची जडणघडण त्यांच्यापासूनच झाली आहे . 
अविनाश चिकटे म्हणाले कि , आम्हाला बाळकडूच माई अप्पाजींच्या सहवासात मिळाले म्हणूनच आम्ही आज समाजात यशस्वी माणूस म्हणून घडलो आहोत लहानपानापासून त्यांनी आम्हाला शिक्षणाची वाचनाची गोडी लावून आमच्यात जिद्द निर्माण केली होती . मुरलीधर बरडे यांनी सुद्धा आपल्या बहिणीच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाले होते . राखीताई खोकले म्हणाल्या यांनी त्यांच्या आयुष्यात समाजातील गोरगरीबांसाठी सदैव आपले जीवन झिजविले त्यांच्या कार्याचा गाडा पुढे घेऊन जाण्याचे काम राजश्रीताई करत आहेत .त्यांच्या जाण्याची यामुळे आम्हाला जाणवत नाही . अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले . 
                     यावेळी आयोजित कार्यक्रमाला नेर येथील तहसीलदार शिवाजीराव मगर, सरपंच नविन काठोडे, उपसरपंच सुनिता झिरे, राजेंद्र महल्ले, किर्ती तगडपल्लेवार, मयूर कोकाटे, रुद्र हेमंत पाटील, अजय झरकर, डॉ. स्वाती दळवी- वाठ, सुधाकर अडकिणे, गोदावरी अर्बनचे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे आणि व्यवस्थापक भारत राठोड , ग्रा.प. सदस्य सविता ढोके, तुषार झलपे, माणिकराव झलपे, नितीन काठोडे, मुरलीधर बरडे, दीपक कोकाटे, निलेश हिवाळे, निवृत्ती बोरकर, स्वप्नील झलपे , अविनाश चिटके, उल्हास ढोकळ, निखिल अंगलहरे, यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad