महिलांनी आता स्वतःला सिद्ध करावे जिजाऊ ब्रिगेडच्या सरोज देशमुखांचे प्रतिपादन
महिलांनी आपल्या तील न्युनतेची भावना दुर सारून स्वतः मधील क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध करावे. आपल्यात जे गुण आहेत ते क्षेत्र निवडावे यश आपल्याच हातात असल्याचे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष सरोज देशमुख यांनी केले. पैनगंगा अभयारण्यात चिखली येथे महिला सन्मान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
चूल आणि मूल या भूमिकेत राहणाऱ्या संस्कार रुपी कर्तव्य सिध्द करणाऱ्या ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा देण्याची हिम्मत करून बचत गटांच्या माध्यमातून प्रगतीची वाटचाल चालू ठेवणाऱ्या महिलांचा सत्कार करून इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कर्माची जाणीव निर्माण करणाऱ्या महिलांचा सत्कार आणि पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. बंदी भाग हा अविकसित असणारा भाग असल्यामुळे या महिलांच्या हाताला काही तरी काम देऊन त्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडने केले.
उमरखेड तालुक्यातील चिखली (वन) येथे हा सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष डोंगरगाव येथील सरपंच सुनीता शिंदे, मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड, प्रा. डॉ. जयमाला लाडे, शांता इंगळे, संगीता वानखेडे, उमेदचे सत्यम सावळे, सेंट्रल बँकेचे दुथडे, संजना पाटील, आयोजक जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष कविता चव्हाण, उपाध्यक्षा रेखा भुत्ते, राऊत, कोषाध्यक्ष अश्विनी कनवाळे, सदस्य रजनी मुडे, सुनीता कांबळे, सपना चौधरी, वंदना वानखेडे, या वेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकास करणाऱ्या संजना पाटील, प्रणीता लाव्हरे, मनिषा वानखेडे, शुंभागी नपते, आशा कलाने, ममता जाधव, सुगंधा वाघमारे, सुनिता खंदारे, शोभा काळबांडे, संगीता मुटकुळे, आदी उपस्थित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा भुते, संचालन रजनी मुडे, शोभा राऊत यांनी केले तर आभार सुनीता कांबळे यांनी मानले.