Type Here to Get Search Results !

आंबेगाव | बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी कडून वर्धापन दिन व जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी कडून वर्धापन दिन व जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा



लोणी धामणी. प्रतिनिधी कैलास गायकवाड ता.८/४/०२२ रांजणगाव ता. शिरूर येथे सात
एप्रिल २०२२ रोजी कंपनीचा २२ व्वा "वर्धापन दिन व जागतिक आरोग्य दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.
बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीकडून दरवर्षी वर्धापन दिन व जागतिक आरोग्य दिना निमित्त पर्यावरणाविषयी समाजात जनजागृती केली जाते. प्लास्टिक प्रदूषण आपल्या पर्यावरणाला खूप वेगाने हानी पोहोचवत असल्याने त्यामुळे जीवसृष्टी धोक्यात येत आहे. करिता प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने यावर्षी कंपनीकडून "प्लास्टिक वापराला नाही म्हणा" या आशयाची थीम घेऊन रांजणगाव औद्योगिक परिसरात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले व प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत सर्वांना आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी रांजणगाव एम. आय. डी. सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मांडगे साहेब हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. पर्यावरणाविषयी राबवत असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे प्लांट हेड श्री अनिल गुप्ता होते. प्लास्टिकची पिशवी लहान तुकड्यांमध्ये मोडते आणि पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळते, ज्यामुळे ती जमिनीत मिसळते आणि झाडांच्या वाढीवरही नकारात्मक परिणाम होत असतो. यासह जलचरांवर हानिकारक परिणाम देखील होतात. मुख्यतः या पिशव्या किराणा सामान किंवा अन्य वस्तू आणण्यासाठी वापर केला जातो याऐवजी प्लास्टिक पिशव्या टाळून त्यासाठी आपण कापडी पिशव्या वापरू शकतो. प्रत्येकाने स्वयंशिस्तीत बदल केल्याने देखील पर्यावरणासाठी मोठा बदल घडू शकतो. असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अण्णासो जाधव, विजय कुलकर्णी, बापूसाहेब बारहाते, गणेश बोकील व इतर अधिकारी यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News