सावे हनुमान जयंती निमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान डॉ.अनिकेत भैया देशमुख यांच्या उपस्थितीत पार
सावे येथे जय हनुमान जयंती निमित्त कुस्त्यांचे विराट मैदान भरवण्यात आले होते सावे ता.सांगोला येथे जनसेवक युवाहृदयसम्राट मा.डॉ.अनिकेत (भैया) देशमुख यांच्या उपस्थितीत व तसेच यासाठी अनेक मल्ल उपस्थित होते. त्याठिकाणी उपस्थित राहून कुस्तीमधील अनेक डावपेच व त्यांना समोरचा मल्ल कसा प्रतिउत्तर देतो हे पहायला मिळाले व यासाठी नारायण तात्या जगताप (उपसभापती पं. स.संगोला) अँडोकेट मारुती ढाळे,सावे गावचे सुपुत्र मा.संतोष देवकते मा.पंचायत समिती उपसभापती मेजर सदाशिव साळुंखे व सरपंच , उपसरपंच ग्रा.पंचायत सदस्य व विकास सेवा सोसायटीचे चेअरमन , व्हा. चेअरमन , संचालक व सावे ग्रामस्थ असंख्य कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
युवाहृदयसम्राट मा. डॉ. अनिकेत (भैया) देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील सुपुत्र पैलवान उदयसिंह खांडेकर यांनी सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2022 मध्ये 92 किलो वजन गटामध्ये रौप्य पदक पटकावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.