लहान मुलांनी ठेवला आयुष्यातील पहिला रोजा
प्रतिनिधी निगंनूर मैनोदिन सौदागर ता.उमरखेड. जि.यवतमाळ
दि. 17 एप्रिल इस्लाम धर्मात दरवर्षी रमजान उल मुबारक हा पवित्र महिना येतो, ज्यामध्ये मुस्लिम समाज उपवास आणि अल्लाहची उपासना करतो. या पवित्र महिन्यात निष्पाप मुले देखील कुराण पाकचे भरपूर पठण करतात आणि प्रार्थना करतात आणि उपवास ठेवतात. दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही मोठ्यांसोबत निरागस मुलांनी देखील रमजान महिन्याचा पहिला उपवास ठेवला. त्यांच्या आयुष्यातील हा पहिला उपवास आहे. कडक उन्हाची पर्वा न करता चिमुकल्यांनी उपवास ठेवला. अल्लाह आणि त्याच्या पैगंबर ह्यांची कृपा मिळवण्यासाठी त्यांना भूक आणि तहान सहन करावी लागली. निगंनूर येथील रहिवासी रफिक सौदागर यांचा 12 वर्षीय मुलगा. अरमान सौदागर यांने पहिला उपवास ठेवला. अरमान हे गेल्या अनेक दिवसांपासून रमजानुल मुबारक महिन्याची आतुरतेने वाट पाहत होता . उपवास ठेवण्यासोबतच अरमान आपल्या वडीला. सोबत नमाजही अदा केली. कडक उन्हात भूक-तहान सहन करत देवाची कृपा मिळवण्यासाठी पहिला उपवास ठेवल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. लहान मुलांसाठी पहिल्या उपवासाला घरात खास पदार्थ बनवले गेले होते
याशिवाय गावात. अशी अनेक मुले आहेत, ज्यांनी आयुष्याचा पहिला उपवास ठेवला आणि दिवसभर प्रार्थनाही केली.