Type Here to Get Search Results !

आंबेगाव ! मंचर पोलीस स्टेशन, येथे आंबेगांव तालुका राष्ट्रवादी क्राॅग्रेस डाॅक्टर सेलच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन

मंचर पोलीस स्टेशन, येथे आंबेगांव तालुका राष्ट्रवादी क्राॅग्रेस डाॅक्टर सेलच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन 



 

 

आंबेगाव तालुका -प्रतिनिधी -कैलास गायकवाड

 


      ता.११/४/२० रोजी मंचर ता.आंबेगाव जि. पुणे मंचर पोलीस स्टेशन येथे आंबेगांव तालुका राष्ट्रवादी क्राॅंग्रेस डाॅक्टर सेलच्या वतीने मंचर पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबीरामध्ये मंचर येथील डाॅ. प्रतिक गायकवाड, डाॅ. प्रताप वळसे, डाॅ. हरीश खामकर, डाॅ. सुदाम खिलारी, डाॅ. विलास मंेगडे, यांनी सहभाग घेतला होता तसेच पुणे येथील फॅंक्रो इंडीयन या लॅबचे वतीन रक्ताविशयीचे चाचण्या केल्या. सर्व वैदयकीय अधिकारी यांनी पोलीस स्टेशनमधील ७ अधिकारी, ४० कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे ५जवान यांची तपासणी केली त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, जुने आजार, तसेच ईसीजी, व दातांचे आजार या सर्व तपासण्या केल्या. 


 डाॅ. विलास मेंगडे यांनी मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी कॅल्शियमचे, रक्तवाढीचे, व इतर आजारावरील गोळया औषधे आणि फस्ट येड किट उपलब्ध करून दिले. त्याबाबत सर्व डाॅक्टरांचे मंचर पोलीस स्टेशनच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन आभार व्यक्त करण्यात आले त्यावेळी डाॅक्टराच्या वतीने बोलताना डाॅ. प्रतिक गायकवाड आणि डॅा. सुदाम खिलारी यांनी हे शिबीर फक्त एवढयावरच मर्यादीत न राहता प्रत्येक ६ महिन्यांनी पोलीस स्टेशन येथे येवुन अशा प्रकारचे आरोग्य विषयी शिबीराचे आयोजन करून कोणाला काही गंभीर आजार असल्यास त्याचे निराकरण करणेकामी मागदर्शन करणार असलेबाबत त्यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्वांचे मंचर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सतीश होडगर यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News