Type Here to Get Search Results !

श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शरद वाळुंज पाटील उपाध्यक्षपदी राजेश सोनवणे

श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शरद वाळुंज पाटील उपाध्यक्षपदी राजेश सोनवणे

लोणी धामणी - प्रतिनिधी -कैलास गायकवाड
ता.१२/४/२०२२ लोणी तालुका आंबेगाव. श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी वाळुंज नगर चे माजी सरपंच शरद शेठ वाळुंज आणि उपाध्यक्षपदी लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे त्यांची बिनविरोध निवड झाली. 


आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ असलेले लोणी गावची विकास सेवा संस्था, रानमळा वाळुंज नगर, लोणी या तीन गावचे मिळून असलेली विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यामध्ये शिवशंभो शेतकरी सहकार पॅनेलचे आठ सदस्य निवडून आले. 

आठ ते दहा कोटी उलाढाल असलेली संस्था असून, आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे गृह मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी पक्षाचे शिवशंभो शेतकरी सहकारी पॅनेल चे यांचे आठ सदस्य निवडून आले. 


अध्यक्षपदी शरद वाळुंज पाटील उपाध्यक्षपदी राजेश सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad