Type Here to Get Search Results !

यवतमाळ | मुस्लिम तरुणांकडून हिंदू महिलेवर विधिवत अंत्यसंस्कार; दिग्रस येथे झाले माणुसकीचे दर्शन

■मुस्लिम तरुणांकडून हिंदू महिलेवर विधिवत अंत्यसंस्कार; दिग्रस येथे झाले माणुसकीचे दर्शन■

■मुस्लिम बांधवांच्या मानवतेला दिग्रसवासीयांचे सलाम■

दिग्रस:-देशात अनेक ठिकाणी लहान लहान कारणावरून जातीय व धार्मिक मतभेद आपण नेहमी पाहतो अथवा ऐकतो परंतु दिग्रस येथील मुस्लिम तरूणांनी मात्र जातीय एकतेचा आगळावेगळा संदेश द्विगुणी केला आहे.यवतमाळ तालुक्यातील वडगाव (मुलकी) येथील रेणुका श्याम कुडमिथे नामक ३८ वर्षीय महिला दिग्रस शहरातील पाटीलनगर येथे भाड्याच्या घरात राहत होती. महिलेची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असल्याने महिलेचा पती पेंटींगचे काम करून कसेबसे आपले उदरनिर्वाह करायचे.रविवार दि.१० एप्रिल रात्री १० वाजताच्या सुमारास रेणुकाने पाटीलनगर येथे राहत्या घरात पती श्याम कुडमिथे याला एका रूम मध्ये बंद करून घरातील पोर्चमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. श्यामला रेणुकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कडताच श्यामने आरडाओरड केली.मात्र त्याच्या मदतीला कोणीही धावून आले नसल्याने शेवटी श्याम ने पोलीस हेल्पलाईन क्र.११२ वर कॉल करू घटनेची माहिती देत मदत मागितली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्यामला सुखरूप बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
मृतकाचे पती श्यामने घटनेची माहिती नातेवाईकांना दिली.नातेवाईक दिग्रस येथे दाखल झाले.श्याम कुडमिथेची आर्थिक परिस्थिती दयनीय असल्याने अंत्यविधीचा खर्च करावा कसा ? हा प्रश्न श्यामला पडला.श्याम ने आर्थिक परिस्थिती बाबत माहिती उपस्थित पोलीस कर्मचारी सुजीत जाधव यांना दिली.
क्षणाचाही विलंब न करता सुजीत जाधव यांनी माजी नगर सेवक सय्यद अकरम सय्यद उमर यांना सदरची माहिती देतास सय्यद अकरम यांनी अंत्यविधीसाठी खर्च करण्याची तयारी दर्शवित मृतदेह नातेवाईकांच्या उपस्थितीतीत ताब्यात घेऊन हिंदू विधिवत अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करून.मृतदेह पत्रकार साजिद पतलेवाले, रुग्णसेवक दिनेश खाडे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हिंदू स्मशानभूमीत नेऊन हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे हिंदू महिलेवर त्यांच्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या १२ वर्षीय मुलाने अग्नी देऊन अंत्यविधी केले.यावेळी माजी नगरसेवक सय्यद अकरम पत्रकार साजिद पतलेवाले,रुग्णसेवक दिनेश खाडे,पोलीस कर्मचारी रमेश जाधव,सुजित जाधव,राम राठोड,अनिल मदने उपस्थित होते.हिंदू महिलेचा अंत्यसंस्कार स्वखर्चाने हिंदू रीतिरिवाजाने केल्याने या मुस्लिम बांधवांच्या मानवतेला दिग्रसवासीयांनी सलाम केला आहे.
हिंदू रीतिरिवाजाने अंत्यसंस्कार करताना सय्यद अकरम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad